गोवा बनावटीचा दारुसाठा बाळगल्या प्रकरणी एकावर कारवाई..!

Edited by:
Published on: April 13, 2024 05:34 AM
views 338  views

देवगड : देवगड महाळुंगे येथे अवैधरित्या गोवा बनावटीची दारु  बाळगल्याप्रकरणी महाळुंगे घाडीवाडी येथील श्रीकांत यशवंत घाडीगावकर (३०) या संशयितावर विजयदुर्ग पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे कारवाई केली आहे. ही कारवाई शुव सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास पाटगाव पोलीस दूरक्षेत्र हद्दीमध्ये पोलीस हवालदार गणेश भोवड व हवालदार अवधूत गुणीजन हे खासगी वाहनाने गस्त करीत होते. यावेळी महाळुंगे घाडीवाडी येथे श्रीकांत घाडीगावकर हा तेथील एका आंब्याच्या बागेनजीक संशयितरित्या दिसला. पोलिसांची चाहूल लागताच संशयित पळून जात असतानाच पोलिसांनी संशयिताला धावत पाठलाग करीत पकडले. संशयिताकडून १२०० रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या १२ सिलबंद बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गुणीजन करीत आहेत.