मिशन 'ऑल आउट' अंतर्गत वीस वाहनांवर कारवाई

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 28, 2024 08:03 AM
views 748  views

कणकवली : कणकवली पोलिसांनी मिशन ऑल आउट अंतर्गत वीस वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. हे कारवाई शनिवारी रात्री सात ते दहा च्या दरम्यान केली. यामध्ये विना लायसन, ट्रिपल सीट, अवजड वाहनांवर क्लीनर नसणे  नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनावर कारवाई करून 17400 चा दंड आकारण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या सूचनेनुसार कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस  उपनिरीक्षक देठे, व ट्राफिक हवालदार आर. के. पाटील, रणजीत दबडे, सुशांत कोलते, रघुनाथ जांभळे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच कणकवली शहरातील हॉटेल लॉज यांची देखील तपासणी करण्यात आली आहे.