
वैभववाडी : शहरातील स्टॉल हटाव बाबतची शुक्रवारची कारवाई स्थगित करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी होणार असल्याचे नगरपंचायतीचे बांधकाम सभापती विवेक रावराणे यांनी सांगितले आहे.स्टाॅलधारकांना अजून दोन दिवसांची मुदत देण्यात आली.त्यां नी आपले स्टॉल व त्यातील साहित्य बाजूला न्यावयाचे आहे. सोमवारी शासकीय जागेतील अतिक्रमण हटविले जाणार आहेत.