कणकवली शहरामध्ये सिंगल युज प्लास्टिक वापरणा-यांवर कारवाई

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 24, 2024 13:18 PM
views 394  views

कणकवली : स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल विभाग अधिसूचना क्र.सी.जी.डी.एल.अ-12082021-228947,दि.12/08/2021, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम,2021, अधिनियमानुसार, कणकवली नगरपंचायतीचे मा. मुख्याधिकारी श्री.परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी पथकाद्वारे कणकवली शहरात दिनांक 24/05/2024 रोजी सिंगल युज प्लास्टिक व सबंधित वस्तू बाळगणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सुमारे ५ आस्थापनांवर 5000/- प्रमाणे दंडात्मक कारवाई करून रक्कम रु. 25000/- वसूल करण्यात आले. आरोग्य लिपिक सतिश कांबळे,स्वच्छता निरीक्षक ,ध्वजा उचले, प्रविण गायकवाड, सचिन तांबे,राजेश राणे, संदीप मुसळे, सिद्धेश सावंत , गणेश लाड व इतर नगरपंचायतीचे कर्मचारी ह्यांच्या द्वारे प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात आली. यावेळी ६९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.यावेळी शहरातील व्यापारी वर्ग व नागरिकांना कापडी पिशवीचा जास्तीत जास्त वापर करून पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.