
सावंतवाडी : गांजा हा अंमली पदार्थ बेकादेशीर रित्या स्वतःजवळ बाळगल्या प्रकरणी प्रविण श्रीरंग पवार रा. काजरावाडी, तेर्सेबांबार्डे, कुडाळ याची ओरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. चव्हाण यांनी सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे. याप्रकरणी ॲड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.
दि. ०५ मार्च २०१८ रोजी तेर्सेबांबार्डे येथील आपल्या राहत्या घरात गांजा हा अंमली पदार्थ बाळगला होता. पोलिसांनी तेथे झडती घेवून घरातील कपाटामधून गांजा हस्तगत केला होता. ओरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात सदर आरोपी विरुद्ध खटला चालविण्यात आला, याकामी सरकार पक्षाच्यावतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. तपासादरम्यान अंगझडतीत असलेला दोष,जप्त मुद्देमाल याचे मोजमाप यामध्ये असलेला दोष व गांजा जप्त करीत असताना तो न्यायालयासमोर आणून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावणे अशा प्रकारचे दोष सरकारपक्ष पुराव्यांसहित साबीत न करू शकल्याने,त्याचा फायदा देवून सबळ पुराव्याअभावी आरोपी याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.याकामी आरोपी तर्फे ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.










