
सिंधुदुर्ग : ऍसिड हल्ला प्रकरणाला आता वेगळे वळण मिळत आहे. आपल्या मुलीवर अन्याय झाला, मुलीच्या मृत्यू सदर मुलगा आणि त्याचे कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप करीत आज दोडामार्ग पोलीस स्थानकात मुलीचे नातेवाईक तक्रार करणार आहेत.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळत असून एकतर्फी प्रेमाची बळी ठरलेल्या त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आता ती मुलगी आणि तो मुलगा यांचे प्रेम संबंध नक्की कसे होते, व्हाट्सअप चॅट च्या माध्यमातून नक्की काय बोलणे झाले? व्हाट्सअप चॅटच तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरला का? कुटुंबीयांकडे अन्य पुरावे कोणते आहेत? कॉल रेकॉर्डिंग पुराव्यामधून काय काय सिद्ध होणार? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे या अधुऱ्या प्रेमाच्या कहाणीला दोडामार्ग मधून भावनिक झालंरही मिळत आहे.