
वैभववाडी : आचिर्णे - अरुळे रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी आचिर्णे धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी आज सकाळपासून सुरू असलेले उपोषण अखेर सोडले. शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी याबाबत यशस्वी मध्यस्थी केली.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्याच लेखी आश्वासन दिले.त्यांनंतर सरबत पिऊन ग्रामस्थांनी उपोषण सोडले.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रदीप जोशी,विनायक चव्हाण, श्री.दुडये, लक्ष्मण रावराणे व ग्रामस्थ उपस्थित होते.










