दगडांनी भरलेल्या ट्रकची एसटी - डंपरला धडक

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 15, 2026 20:40 PM
views 19  views

सावंतवाडी : सावंतवाडी-बेळगाव मार्गावरील कोलगाव येथे आज दुपारी तिहेरी अपघात झाला. चिरा दगडांनी भरलेल्या ट्रकने एसटी आणि डंपरला धडक दिली. यात एसटीच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. तर डंपरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आंबेगाव-सावंतवाडी ही एसटी बस सावंतवाडी बसस्थानकाच्या दिशेने येत होती. तर डंपर माडखोलच्या दिशेने जात होता. त्याचवेळी बेळगावच्या दिशेने चिरा दगड भरून येणारा ट्रक समोरून आला. चालकाचा ताबा सुटला त्याने प्रथम बसला, त्यानंतर डंपरला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस हवालदार मनोज राऊत आणि सुरेश राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.