तिलारी घाटात टेम्पो पलटी

Edited by: लवू परब
Published on: November 13, 2025 17:26 PM
views 155  views

दोडामार्ग : तिलारी घाटात एक मालवाहू टेम्पो पलटी होऊन अपघात झाल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने चालक सुखरूप असून टेम्पोचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

तिलारी घाट माथ्यावरून एक टेम्पो काही सामान घेऊन गोव्याला जाण्यासाठी तिलारी घाट मार्गे येत होता. दरम्यान घाटातील तीव्र उताराच्या यु वळणावर टेम्पो आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला व काही अंतर फरफटत गेला. अपघातात चालक सुखरूप बचावला. टेम्पोने रस्ता व्यापल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. यावेळी एकेरी वाहतूक सुरू होती.