
दोडामार्ग : तिलारी शेटवेवाडी येथे दुचाकी व बोलेरो पिकअप मध्ये झालेल्या भीषण अपघातात कुंब्रल धनगरवाडी येथील २० वर्षीय युवक राहुल दिलीप वरक हा जागीच ठार झाला आहे. रविवारी दुपारी तिलारीत पर्यटन करून सहकारी मित्रांसोबत माघारी परताना सायं ४ च्या सुमारास त्याच्यावर काळाने घाला घातला.
तिलारीत पर्यटन करून सहकारी मित्रां सोबत ३ दुचाकीने माघारी परतत असताना राहुल दिलीप वरक याच्या दुचाकीची तिलारी चंदगडच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअपला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात राहुल च्या डोक्याला गंभीर इजा होऊन मोठा रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. मात्र या अपघातात राहुल सोबत दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र सुदैवाने बचावला आहे. त्यालाही डोक्याला मार बसला आहे. त्याला उपचारासाठी पुढे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघाताने तिलारी दोडामार्ग राज्यामार्ग वरील वाहतूक अर्धा पाऊण तास ठप्प राहिली. घटनास्थळी पोलीस दाखल झालेवर तातडीने अब्युलन्सने मृत व जखमीना नजकीच्या रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याने घाबरून बोलेरो पिकअप चालकाने घटनास्थळावरून पालायन केलं. यां अपघाताचे वृत्त समजताच अनेकांनी तिलारी कडे धाव घेतली आहे. घटनास्थळी अधिक तपासासाठी आपल्या टीम सह दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे हे ही रवाना झाले आहेत.










