मळगाव ब्रीजवर भीषण अपघात

जीवितहानी नाही
Edited by: विनायक गावस
Published on: June 09, 2025 09:06 AM
views 415  views

सावंतवाडी : मळगाव ब्रिजवर टेम्पो ट्रॅव्हलर्स व डंपरमध्ये भीषण अपघात झाला. गुजरात येथून गोव्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलरच्या दर्शनी भागाचा यात चेंदामेंदा झाला. यात ट्रॅव्हलर चालकासह एक प्रवासी गंभीर असून इतरांना दुखापत झाली आहे. दैव बलवत्तर म्हणून सदैववाने जीवितहानी टळली.


आज सकाळी 5 च्या सुमारास झराप- पत्रादेवी हायवे मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथे हा अपघात घडला. मळगाव ब्रिजवर टेम्पो ट्रॅव्हल्स व डंपर यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सने मागून डंपरला जोरदार टक्कर दिली. ही टक्कर एवढी मोठी होती की डंपरचची मागील दोन्हीही चाक तुटून रस्त्याच्या बाजूला पडली. तर टेम्पो ट्रॅव्हल्स जाऊन झाडाला जोरदार आदळली. या अपघातात गोवा दर्शनासाठी जाणार गुजरात सुरत येथील कुटुंब जखमी झाल. त्यामध्ये मयूर मालविया 35, समीक्षा मालविया 32, चंद्रिका मालविया 37, बन्सी मालविया 21, हीत मालविया 10 किरीट मालविया 42 हे किरकोळ जखमी झाले. तर ड्रायव्हर विजयकुमार झापडी  35 याचे हात-पाय फ्रॅक्चर असल्याने त्याला गोवा बांबुळी येथे पाठवण्यात आले. याप्रसंगी संजय जोशी, सचिन मांजरेकर यांनी जखमींना मदत करून 108 ला कॉल केला. त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली. तर सुहास पेडणेकर यांनी अपघातग्रस्तांचे सामान आपल्या रिक्षेमध्ये घालून  हॉस्पिटलमध्ये सुपूर्द केले.  घटनेच्यावेळी  सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले तेथील ग्रामस्थ संजय जोशी, बाळा आरविंदेकर, सुनील नेमळेकर, दीपक जोशी, सचिन मांजरेकर, प्रणव मांजरेकर, गणेश जोशी, रिक्षा चालक सुहास पेडणेकर,  हॉस्पिटलमध्ये तत्काळ रुग्णांना सेवा देणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम यांनी अपघातग्रस्तांना मदत कार्य केलं. यासाठी मालविया परिवाराकडून त्यांचे आभार मानण्यात आले.