
सिंधुदुर्गनगरी : मुंबई - गोवा महामार्गावरील हुमरमळा येथील टाटा मोटर्स शोरूमच्या समोर झालेल्या अपघातात युवक आणि युवतीचे निधन झाले आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात आणखी आठजण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हुमरमळा येथील टाटा मोटर्स शोरूम समोर इनोव्हा कार, मोटारसायकल आणि डंपर यांच्यात हा अपघातात झाला. यातील मोटार सायकल वरील अनुष्का अनिल माळवे ( वय १८) रा. (अणाव दाबाचीवाडी), आणि विनायक मोहन निळेकर (वय २२) रा- रानबांबुळी हे दोघे युवक युवती डंपर खाली चिरडून ठार झाले. तर टाटा मोटर्स शोरूमचा सिक्युरिटी गार्ड रोहित कुडाळकर याच्यासह इनोव्हा कारमधील आठ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करत आहेत.