
वैभववाडी : भुईबावडा घाटात अवघड वळणावर ट्रक व चारचाकी यांच्यात अपघात झाला.हा अपघात आज (ता.१५) दुपारी झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र चारचाकीचे नुकसान झाले.दोन्ही वाहनचालकांनी आपापसात विषय मिटविल्यामुळे अपघाताची पोलीस स्थानकात याची नोंद झाली नाही.
असळज येथील साखर कारखान्यावर ऊस उतरून (एमएच ०९,एल४९१२)हा ट्रक भुईबावड्याच्या दिशेने येतं होता.याच दरम्यान वैभववाडीहून कोल्हापूरच्या दिशेने चार जण कार घेऊन निघाले होते.भुईबावडापासून सहा किमी अंतरावर घाटातील अवजड वळणार या दोन्ही वाहनांची एकमेकांना धडक बसली.सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.या अपघातामुळे दोन्ही वाहने रस्त्यावर असल्याने घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसस्थानकाचे पोलीस कॉ. हरिश्चंद्र जायभाय आणि मोहन राणे हे घटनास्थळी पोहोचले. दरम्यान दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरू केली.त्यानंतर अपघातातील दोन्ही वाहन चालकांनी हे प्रकरण आपापसात मिटविले.त्यामुळे या अपघाताची नोंद पोलीस स्थानकात झाली नाही.