
दोडामार्ग : तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथे एका कंटेनरला अपघात झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. संरक्षक कठड्यामुळे तो खोल दरीत कोसळण्यापासून बचावला. मात्र, कंटेनरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. घाटमाथ्यावरून गोव्याला जाणारा एक कंटेनर तिलारी घाट मार्ग येत होता. घाट उतरत असताना जयकर पॉईंट येथील तीव्र उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. कंटेनर रस्त्यालगतच्या संरक्षक कठड्याला जोरात आढळला. या अपघातात चालक बचावलाआहे.