
वैभववाडी: शहरात नगरपंचायतीने खोदुन ठेवलेल्या गटारावरून ये-जा करण्यासाठी ठेवलेल्या प्लायवरून वयोवृध्द महिला पाय घसरुन पडली.ही घटना आज सायंकाळी ६वा घडली.यात महीलेच्या डोक्याला दुखापत झाली आहे.या प्रकारानतंर उपस्थितांकडून नगरपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.गणेश चतुर्थीत हे प्लाय धोकादायक ठरणार आहेत.यावर नगरपंचायतीने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.अन्यथा मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक आहे