हायवेवर अपघात ; माय - लेक जखमी

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 13, 2025 12:07 PM
views 2280  views

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ सांगिर्डेवाडी येथे कार रस्त्यारील दुभाजकावर असलेल्या मैल खांबाला आढळून झालेल्या अपघातात आई व मुलगा किरकोळ जखमी झाले. हे दोघेही गोव्यावरून पुणे येथे जात होते हा अपघात एवढा गंभीर होता की कार गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला तर एअर बलून उघडले या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमी झालेल्यांमध्ये चालक प्रसन्नख बागकर व त्याची आई आरती बागकर हे आहेत.

बागकर कुटुंबीय गोवा येथे फिरण्यासाठी गेले होते. गोवा फिरून झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती मोपा विमानतळावरून पुणे येथे जाण्यासाठी निघाले तर प्रसन्ना बागकर व त्याची आई आरती बागकर हे दोघेजण आपल्या कार गाडीने गोवा ते पुणे असे जात असताना महामार्गावरील कुडाळ सांगिर्डेवाडी येथे आल्यावर प्रसन्ना भाकर याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि कार गाडी रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या मैल खांबाला जाऊन धडकली आणि सुमारे २५ मीटर जाऊन थांबली. यामध्ये कारचा पुढील भाग चक्काचूर झाला टायर फुटले गाडीमधील दोन्ही एअर बलून उघडले सुदैवाने कार मधील आई व मुलगा यांना किरकोळ दुखापत झाली त्यांना उपचारासाठी भाजप शहर अध्यक्ष सुनील बांदेकर व नगरसेवक निलेश परब यांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले त्यादरम्यान महामार्गाचे वाहतूक नियंत्रक पोलीस व कुडाळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.