
सावंतवाडी : गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावर वेत्ये येथे रस्त्यावर पाणी साचल्याने महेंद्र थार गाडीचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी सरपंच गुणाजी गावडे यांनी धाव घेत वाहन चालकाला बाहेर काढले.
त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने मोठा अनार्थ टाळला. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान या अपघातानंतर सरपंच गुणाजी गावडे हे आक्रमक झाले. हायवे वर पाणी साचत असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा बांधकाम विभागाला घेराव घालू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.