कणकवलीत जानवली इथं अपघात | दोघे गंभीर

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 14, 2024 14:02 PM
views 1820  views

कणकवली : कणकवली जानवली गावठणवाडी बस स्टॉप येथे सायंकाळी ६ च्या सुमारास अपघात झाला. कणकवली वरून जानवलीच्या दिशेने जाणाऱ्या चार चाकी वाहनाने दोघांना धडक देऊन चार चाकी वाहनाने पलायन केले. यात दोघे जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पलायन केलेल्या चार चाकी वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी देखील केली आहे.