मासे विक्रीसाठी जाणाऱ्या टेम्पोचा अपघात

महिलांना किरकोळ दुखापत
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 23, 2025 12:41 PM
views 2172  views

मालवण : मालवण वरून कणकवलीच्या दिशेने मासे विक्रीसाठी जाणाऱ्या टेम्पोचा मंगळवारी सकाळी आनंदव्हाळ उतारावर अपघात झाला. या अपघातात टेम्पो मध्ये बसलेल्या महिलांना किरकोळ दुखापत झाली. तर टेम्पोच्या दर्शनी भागायचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे टेम्पो चालक गणेश तांडेल आपल्या ताब्यातील महिंद्रा पिकप टेम्पोसह मच्छी विक्रेत्या महिलांना घेऊन मालवण येथून कणकवलीच्या दिशेने जात असताना साडेनऊच्या दरम्याने आनंदव्हाळ उतारावर समोरून ओव्हरटेक करीत येत असलेल्या कारला वाचवण्यासाठी ब्रेक मारल्याने रस्त्याकडेची दगडी भिंत कोसळून अपघात झाला सुदैवाने टेम्पो खाली दरीत जाता जाता झाडाला धडक बसल्याने थांबाला नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती.

अपघातात जखमी झालेल्या मच्छी विक्रेत्या महिलांना चौके प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले. अपघाताची खबर मिळतात मालवण येथून मोठ्या प्रमाणावर मच्छीमार बांधव अपघातस्थळी दाखल झाले.  मच्छिमार बांधव, व्यवसायिक, मत्स्य एजंट यांनी त्याठिकाणी धाव घेतली. स्थानिक नागरिकही एकत्र आले. जेसीबी च्या मदतीने टेम्पो बाहेर काढण्यात आला. मालवण पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली. पोलीस जितेंद्र पेडणेकर, श्री.परब, अजय येरम अधिक तपास करत आहेत.