भीषण ; एसटीला ओव्हरटेक करण्याच्या नादात जीव गमावला

Edited by:
Published on: December 17, 2024 21:06 PM
views 1704  views

कुडाळ : दुचाकीने जात असताना एसटीला ओव्हरटेक करत असताना समोरच्या दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात कोलगाव येथील युवक जागीच ठार झाला आहे.


सागर साईल, रा. कोलगाव वाघडोळावाडी असे या युवकाचे नाव आहे. हा अपघात आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आकेरी बाजारपेठेत घडला. हा अपघात एवढा जबरदस्त होती की गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर मृत युवकाचे हाताची बोटे तुटून पडली तसेच डोक्याच्या भागाला देखील जबरदस्त मार बसला आहे घटनास्थळी गर्दी जमली असून पोलीस दाखल झाले आहे.


सागर हा गवंडीकाम वैगेरे करणारा होता काही कामानिमित्त तो कोलगाव वरुन झाराप च्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आहे.