बस - स्कुटीची धडक, एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Edited by: मनोज पवार
Published on: December 01, 2024 16:10 PM
views 1149  views

खेड : खेड भरणे गोवळवाडी माऊली गॅरेज समोर अपघात 1 डिसेंबर दुपारी 12 वा सुमारास अपघात झाला. भरणे गोवळवाडी येथे खेड वरून मुंबईच्या दिशेने जात आसलेल्या प्रायव्हेट बस क्रमांक MH 06 S 9731मुंबईच्या दिशेने जात असलेल्या स्कुटी प्लेझर क्रमांक MH 08 AK 2933या गाडीला धडक दिली असता या स्कुटीने दुसऱ्या स्कुटी क्रमांक MH 08 AS 9241धडक दिल्याने या अपघातात 1जागी मृत्यू व तीन किरकोळ जखमी असल्याचे समजते. 

खेड भरणे नाका ब्रिज खाली उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नानिजधाम 24 तास मोफत रुग्णवाहिकेच्या मदतीने  उपजिल्हा रुग्णालयात जखमींना आणण्यात आलं.  रवींद्र सुरेश सुतार (वय 33) राहणार कळंबणी,  सांची रवींद्र सुतार (वय सात वर्ष) राहणार कळंबणी, राहुल संतोष सुतार राहणार कळंबणी हे किरकोळ जखमी आहेत. स्कूटी चालक मुबीन नाडकर ( रा. संगलट, खेड) याचा जागीच मृत्यू झाला.