
दोडामार्ग : दोडामार्ग बांदा मार्गावर आडाळी एमआयडीसी येथे वाळू वाहतूक करणाऱ्या सुसाट डंपर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने डंपर रस्त्याच्या बाजूला गटारात कलंडला. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण भाजी विक्री करणारे आडाळी येथील रामू गावडे बालबाल बचावले.
याबाबत अधिक माहिती अशी की दोडामार्ग येथे वाळू खाली करून पुन्हा कुडाळच्या दिशेने जाणारा डंपर आडाळी एमआयडीसी येथे पोहचला असता डंपर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने डंपर गटारात कलंडला. या अपघातावेळी रस्त्याच्या बाजूला भाजी विक्री करणारे आडाळी येथील रामू गावडे यांचे भाजीचे दुकान व ते बालबाल बचावले असे गावडे यांनी सांगितले.