सावंतवाडी : सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या एसटीला मळगाव घाटात समोरून येणाऱ्या लक्झरीने धडक दिली. यामुळे एसटी सरंक्षक कठड्याला घासली. चालाकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मळगाव घाटीत ठीकठीकाणी सरंक्षक भिंत पूर्णपणे तुटलेल्या स्थितीत आहे. काही ठिकाणी अर्धवट स्थितीत आहे. याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी लक्ष वेधूनी ही संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संबंधित विभाग मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का ? असा सवाल वाहनधारक व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.