कुंभारमाठ येथील अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 20, 2024 04:33 AM
views 1113  views

मालवण : शहरातील स्टेट बँक समोरील रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अवधूत किशोर निकम (वय- ४५) रा. कुंभारमाठ यांचा मृत्यू झाला. ही घटना १०.४० वाजण्याच्या दरम्यान घडली. 

     याबाबतची माहिती अशी कुंभारमाट येथील अवधूत निकम हे शहरातील आपले काम पूर्ण करून दुचाकीने कुंभारमाठ येथे घरी जात असता शहरातील स्टेट बँक समोरील रस्त्यावरअचानक कुत्रा आडवा आल्याने त्याचा अपघात झाला. यात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्याचे समजताच स्थानिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अवधूत यांच्या अकाली निधनाने शहर, कुंभारमाठ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या अपघाताचे वृत्त कळताच ग्रामीण रुग्णालय परिसरात त्यांच्या मित्रपरिवारांनी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्रामीण उपचारासाठी जात अपघाताची माहिती घेतली.