देवगड न.प.च्या स्वीकृत नगरसेवकपदी विश्वामित्र खडपकर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 20, 2023 13:48 PM
views 77  views

देवगड : विश्वमित्र खडपकर यांची देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी  निवड करण्यात आली आहे. विश्वामित्र खडपकर यांची निवड भाजपाच्या वतीने बिनविरोध करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवक चिंदरकर यांनी राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली आहे.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरल, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे, माजी उपनगराध्यक्ष उमेश कनेरकर, विशेष कार्यकारी अधिकारी बाळा गावकर, बापू जूवाटकर, दयानंद पाटील, शामराव पाटील, वैभव कळंगुटकर, भाजपा महिला अध्यक्ष उषःकला केळुस्कर भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी नंदकुमार काकतकर यांनी काम पाहिले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देवगड जामसांडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे उपस्थित होते.