लोकप्रतिनिधीकडूनच पदाचा गैरवापर..? | वृद्ध दांपत्याचं घंटानाद आंदोलन

Edited by: विनायक गांवस
Published on: April 25, 2024 11:23 AM
views 141  views

सावंतवाडी : माडखोल गावच्या उपसरपंच पदावर असलेल्या लोकप्रतिनिधीकडूनच पदाचा गैरवापर करत सामायिक जमिनीमध्ये अनधिकृत बांधकाम उभारण्यात आल्याचा आरोप करत ज्ञानेश्वर फटू राऊळ व जयवंती ज्ञानेश्वर राऊळ या दांपत्याने प्रांतांधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन छेडले‌. तंटामुक्ती विभागाकडे अर्ज करून सुद्धा अध्यक्ष व सचिव यांनी दखल घेतली नसल्याने आम्हाला कोण न्याय देईल ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात यावे अशी मागणी करत व संबंधितांवर कारवाईची मागणी करत न्याय मिळेपर्यंत आंदोलन  चालू राहील असा इशारा त्यांनी दिला.