
सावंतवाडी : गोदाम पालकास शिविगाळ व धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश श्रीमती देशमुख यांच्या न्यायालयात हा खटला चालला.
17 फेब्रुवारी 2020 रोजी फिर्यादी अकिल अब्बास पठाण हे साठेली भेडशी येथिल शासकीय गोदामामध्ये गोदाम पालक म्हणून कार्यरत असताना संध्याकाळी ट्रक चालक मालक अध्यक्ष जॉनी ऊर्फ बावतीस फर्नाडीस व त्यांच्या सोबत निलंबित हमाल संजय गावडे यांनी गोदामामध्ये अनाधिकारे घुसुन "तु धान्यामध्ये नेहमी तुट का दाखवतोस, तुला नोकरीवरून काढुन टाकणार, आमच्या समक्ष व तहसिलदार समक्ष धान्याच मोजमाप कर नाहीतर आम्ही गोदामातुन जाणार व गोदाम बंद करावयाला देणार नाही" अशी धमकी देऊन शासकीय कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. म्हणुन फिर्यादीने तहसिलदार दोडामार्ग यांना फोन लाऊन हकीगत सांगितली असता तहसिलदार कार्यालयातील जबाबदार कर्मचारी व तद्नंतर दोडामार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आले व नंतर वर नमुद आरोपी व इतर लोक गोदामातुन गेले अशा आशयाची फिर्याद दाखल करण्यात आली. या खटल्यात फिर्यादी पक्षाच्या वतीने एकुण 5 साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्याचे कथन करता सरकार पक्षाच्या साक्षीदारांच्या पुराव्यातील विसंगत, उशीराने दाखल केलेली फिर्याद तसेच स्वतंत्र साक्षीदार उपलब्ध असताना त्यांना न तपासता केवळ आपल्या मर्जीतील साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले. आदीमुद्दे आरोपी पक्षातर्फे अॅड. परिमल नाईक यांनी मांडले. हे मुद्दे ग्राह्य मानुन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने अॅड. परिमल नाईक, अॅड. सुशिल राजगे, अॅड. रश्मी नाईक, अॅड. अमिषा बांदेकर यांनी कामकाज पाहीले.