मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत वेंगुर्ला तालुक्याला सुमारे १९ कोटींचा निधी : सचिन वालावलकर

Edited by: दिपेश परब
Published on: July 20, 2024 05:39 AM
views 251  views

वेंगुर्ले : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ संशोधन व विकास योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील सुमारे ११ किमी ६५० मीटर लांबीचे सुमारे १९ कोटी रुपायांचे एकूण ४ ग्रामीण रस्ते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारशीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी मंजूर केले असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी दिली आहे. 

वेंगुर्ला तालुक्यातील मंजूर केलेल्या या रस्त्यात सुमारे ३ किमीचा उपरल ते नाईकवाडी रस्ता (४ कोटी ५६ लाख), सुमारे ४ किमीचा वेतोरे ते नमसवाडी रस्ता (५ कोटी ७३ लाख), सुमारे २किमी १५० मीटरचा परुळे ते कर्ली रस्ता (३ कोटी ४३ लाख), २ किमी ५०० मीटरचा वेतोरे ते झाराप रस्ता (३ कोटी ६० लाख) असे रस्ते मंजूर करण्यात आले असल्याची माहिती वालावलकर यांनी दिली आहे.