अबीद नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 23, 2025 19:24 PM
views 116  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रत्येक प्रभागात प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे युती असल्याने कनकनगर प्रभाग क्रमांक 17 या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते तथा उमेदवार अबीद नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अबीद नाईक, माजी जि.प. अध्यक्ष संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक बाबू गायकवाड, गजानन देसाई यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.