अबीद नाईक यांनी केले महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे सिंधुदुर्गात जल्लोषी स्वागत

Edited by:
Published on: April 28, 2025 13:23 PM
views 72  views

कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार श्री सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडला.यानंतर ही रथयात्रा सिंधुदुर्ग येथे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री.बाप्पा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांसहित राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.अबीद नाईक यांनी या रथयात्रेचे जल्लोषात स्वागत केले.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैशिष्ट्यपूर्ण नद्या आणि संगम येथील पाणी आणि माती या रथयात्रेतून मंगल कलशाच्या माध्यमातून मुंबई येथे घेऊन जाण्यात येणार आहे आणि एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

ही रथयात्रा सिंधुदुर्गात आल्यानंतर मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरती रथयात्रेचे स्वागत करण्यात आले आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वांनी दर्शन घेतले.तसेच तेथील पवित्र माती आणि किल्ल्यावरील विहिरीतील पवित्र पाणी हे एकत्र करून त्या कलशाची पूजा-अर्चा करून कलश मुंबई येथून आलेल्या रथामध्ये समाविष्ट करण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील असंख्य राष्ट्रवादी पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.ढोल ताशाच्या पथकात हा संपूर्ण नेत्र दीपक असा सोहळा संपन्न झाला. कार्यकर्त्यांची तोबा गर्दी आणि उत्कृष्ट नियोजन पाहून राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस श्री.बाप्पा सावंत यांनी जिल्हाध्यक्ष अबीद  नाईक यांचे कौतुक केले.संपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्रगीत आणि राष्ट्रगीताने करण्यात आला.कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यापूर्वी काश्मीर पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे भारतीय निष्पाप नागरिक मारले गेले त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली.

प्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस श्री.बाप्पा सावंत साहेब,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक,जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर,प्रदेश चिटणीस सुरेश गवस,प्रदेश चिटणीस एम.के गावडे.महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई परब.प्रांतिक सदस्य विलास गावकर,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत,संदीप राणे,शहर अध्यक्ष इम्रान शेख,उपाध्यक्ष गणेश चौगुले,युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, सचिन अडुळकर,केदार खोत,सुनील उर्फ बाळू मेस्त्री,राष्ट्रवादी मालवण तालुका अध्यक्ष नाथा मालवणकर, कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर,वैभववाडी तालूका अध्यक्ष वैभव रावराणे, देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान,वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर,ओबीसी जिल्हा अध्यक्ष सर्वेश पावास्कर,तालुका उपाध्यक्ष विराज भालेकर, बंटी परब, कणकवली महिला तालुका अध्यक्षा स्नेहल पाताडे, जिल्हा सचिव सतीश पाताडे,वैभववाडी महिला तालुका अध्यक्ष श्रेया मुद्रस,रमेश मोपेलकर,शशी मुद्रस,मोहन लसने, साईद काझी,मुश्ताक काझी, हनिफ काझी,नजीर शेख,जिल्हा सचिव सुशील चमनकर,महिला तलुकाध्य वेंगुर्ला ऋतुजा शेटकर,शहर अध्यक्ष सूरज परब,वर्धा परब,वेंगुर्ला तालुका सरचिटणीस संदीप सातार्डेकर,वेंगुर्ला उपाध्यक्ष सचिन पेडणेकर,संतोष राऊळ,दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष मेगेंद्र देसाई,दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष साबाजी सावंत,जिल्हा उपाध्यक्ष एम डी सावंत,कामगार सेल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गावकर उपस्थित होते.