वैभववाडी दत्त मंदिर येथे अभिषेक

खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 15, 2024 14:40 PM
views 192  views

वैभववाडी : खासदार विनायक राऊत  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैभववाडी दत्त मंदिरात शिवसेनेचे नेते  अतुलजी रावराणे यांनी अभिषेक केला.येणा-या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानी विजयी होऊ दे असं साकडं देवाला घातलं.

खा.राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील मंदीरांमध्ये अभिषेक करण्यात आले.शहरातील दत्त मंदिरात अतुल रावराणे यांच्या हस्ते अभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी तालुका अध्यक्ष मंगेश लोके , शहर प्रमुख शिवाजी राणे, नगरसेवक रणजित तावडे, मनोज सावंत माजी सभापती लक्ष्मण रावराणे ,रोहन रावराणे , स्वप्नील रावराणे,युवराज रावराणे, विठोजी पाटील यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.