
सावंतवाडी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सावंतवाडी शाखेच्यावतीने रक्षाबंधन निमित्त सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना राखीचे रक्षाबंधन बांधून पोलिस कर्मचाऱ्यांना समाज रक्षण तर आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वास्थ रक्षणाचे वचन दिले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या अनोख्या रक्षाबंधनाने पोलीस कर्मचारी भारावून गेले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी समाज रक्षणासाठी तर योग्य कर्मचाऱ्यांनी स्वास्थ रक्षणासाठी तत्पर राहण्याचे वचन दिले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सावंतवाडी शहर प्रमुख ज्ञानेश्वर गवळी, जिज्ञासा संयोजक स्नेहा धोटे , तेजल कित्तुरे, उत्तरा पेडणेकर, प्रतिक्षा चन्ने आदी उपस्थित होते.