दिल्लीत काँग्रेस नेत्यांसमोर चर्चेत असलेल्या जागांवर उबाठाकडून एबी फॉर्म : नितेश राणे

Edited by:
Published on: October 25, 2024 12:42 PM
views 252  views

कणकवली : काँग्रेस पक्षाच्या यादीत असलेल्या जागांवर उद्धव ठाकरे आपले एबी फॉर्म देऊन कार्यकर्त्यांना उमेदवारी देत आहेत. राज्यात अशा दहा जागा आहेत ज्या वर दिल्लीत काँग्रेस पक्ष श्रेष्ठी समोर चर्चा सुरू आहे. मात्र, एकीकडे महाविकास आघाडीची पिपाणी वाजवायची आणि दुसरीकडे स्वतःच्या मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला भीक न घालता आपल्या पक्षाची उमेदवारी वाटण्याचे काम उबाठाच्या माध्यमातून सुरू आहे. यातूनच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आयुष्यात कोणाचेच होऊ शकले नाहीत ते काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ही होऊ शकत नाहीत हे दिसून आले आहे. कोकणा मधून तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला एकही जागा न देता भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहिली आहे.अशी टीका भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केली.

आमदार नितेश राणे पत्रकार परिषद कणकवली येथे बोलत होते. महाविकास आघाडीच्या जागा वाटप मध्ये मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्म वाटले जात आहेत.जे अर्ज उद्धव ठाकरे वाटतं आहेत त्यातले किती जगा काँग्रेस ला द्यायचे ठरले होते हे काँग्रेस पक्षाने प्रामाणिक पने जाहीर करावे. आज काँग्रेस ला कोकणातून उद्धव ठाकरे ने भुईसपाट केले आहे संपून टाकलं आहे.याचा काँग्रेस ने विचार केला पाहिजे.जर कोकणात सर्व जागा उबाठा लढणार तर विदर्भात काँग्रेस ला झुकते माप का नाही असा सवाल यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला.