'आराध्य सिनेमा' थिएटरचा १ सप्टेंबरला शुभारंभ..!

Edited by: विनायक गावस
Published on: August 30, 2023 19:13 PM
views 421  views

सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप झिरो पॉईंटनजीक नव्यानं उभारलेल्या 'आराध्य सिनेमा' या थिएटरचा शुभारंभ १ सप्टेंबरला होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर व उद्योजक शैलेश पै यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती क्रेडाई सावंतवाडीचे अध्यक्ष नीरज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला तालुक्यासह बांदा-शिरोडा या महत्त्वाच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाला लागून झाराप झिरो पॉईंट येथे बांधकाम व्यवसायिक उदय पारळे व त्यांच्या पत्नी स्मिता पारळे यांनी हा प्रकल्प उभारला आहे. आराध्य सिनेमा सोबतच याठिकाणी दर्जेदार असा सुसज्ज हॉल, हॉटेल राहण्याची व्यवस्था ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना जेवणासह राहण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकाच ठिकाणी सर्व सोयी असल्याने सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार असल्याचा विश्वास निरज देसाई यांनी व्यक्त केला.

शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आराध्य सिनेमाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावसकर व सावंतवाडीचे उद्योजक शैलेश पै यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  सावंतवाडी वेंगुर्ला व कुडाळ तालुक्याचा विचार करता दर्जेदार अशा सिनेमा थिएटरची कमतरता उदय पारळे यांनी ओळखून येथील जनतेसाठी ते उपलब्ध करुन दिले आहे. याठिकाणी नवनवीन सिनेमा उपलब्ध करुन देण्यात येणार असून अन्य आवश्यकत्या सर्व सोयी सुद्धा ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती निरज देसाई यांनी दिलीय