नवीन आधारकार्ड बनवायचंय, नंबर अपडेट करायचाय ?

पोस्ट विभागाकडून मळगावात शिबीर
Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2025 11:47 AM
views 287  views

सावंतवाडी : पोस्ट विभागकडून मळगाव येथे बुधवार दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आधारकार्ड शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात नवीन आधारकार्ड बनवणे, सोबतचं आधारकार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे, पत्ता बदलणे व इतर बदल करून देण्यात येणार आहेत. नागरीकांनी या शिबीराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 8275316155 / 9405979751 या नंबरवर संपर्क करण्यात यावा असे म्हटले आहे.