सावंतवाडी : जंगलात शिकारीसाठी गेले असता बंदुकीचा बार उडाल्याने शेरे लागून पारपोली गुरववाडी येथील कृष्णा अर्जुन गुरव (वय 35) हा तरुण गंभीर जखमी झाला. हा प्रकार 25 डिसेंबर रोजी रात्र अकरा वाजण्याच्या सुमारास लिंगाचे वांयगण येथील जंगलात घडला. जखमीवर गोवा बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील वेदांत लक्ष्मण गुरव (22) रविकांत वसंत गुरव (40) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.