
वेंगुर्ला : शिरोडा- केरवाडी येथील तरुण गणेश दीपक तांडेल (वय-32) याने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज (७ ऑक्टोबर) दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मयताचा भाऊ अक्षय दीपक तांडेल यांनी वेंगुर्ले पोलिसात खबर दिली. त्यानुसार वेंगुर्ले पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गणेश तांडेल यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगी, आई व भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजेंद्र भिसे करत आहे.