
महाड : पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत सतीश भरत पवार (वय 23 रा. सोलमकोंड ,मूळ रा.भांदेकोंड, धामणे) येथील एका तरुणाने आपल्या राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलीने लग्नास नकार दिल्याने दारूच्या नशेमध्ये आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी मयत सतीश भरत पवार यांनी मोबाईलवर स्टेटस ठेवून आपलं जीवन संपविले. सदरचा मृत्यूदेह शवविच्छेदनाकरिता महाड ग्रामीण रुग्णालया येथे पाठविण्यात आला आहे. सदरच्या मृत्यूची महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी. व्हीं.येडवळे हे करीत आहेत.