
सावंतवाडी : मोती तलावात बुडणाऱ्या वृद्ध महिलेला सावंतवाडी पोलिसांसह माजी नगरसेवकांनी वाचवल आहे. आज सकाळी न्यायालयाच्या आवारात हा प्रकार घडला. माजी नगरसेवक सुरेश भोगटे, पोलीस प्रवीण वालवालकर, जगदीश दूधवडकर यांनी आपला जीव धोक्यात घालून त्या वृद्ध महिलेचा जीव वाचवला. शोभा आत्माराम नाईक रा. खासकीलवाड असे तिचे नाव असून तिला अधिक उपचारसाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळी एक वयोवृद्ध महिला तलावाच्या पाण्यामध्ये पडून झाडाच्या फांदीला पकडून जीव वाचवण्यासाठी मदतीसाठी हात उंचावत होती. मॉर्निंग वॉकसाठी फिरत असताना येथील नागरिकांना ती दिसून आली. नागरिकांनी यावेळी धाव घेत तलावातील होडीच्या साह्याने तिला पाण्यातून बाहेर काढत जिवदान दिलं. मॉर्निंग वॉकसाठी आलेले पोलीस तसेच माजी नगरसेवक सुरेश भोगटे, अजय मांजरेकर, संजय म्हापसेकर, रवी मडगावकर, प्रल्हाद तावडे, राऊळ यांनी यासाठी पुढाकार घेतला.










