कणकवलीत कार ने महिलेला उडवले महिला गंभीर जखमी

तहसील कार्यालयासमोरील सर्विस रस्त्यावर झाला अपघात एक मुलगीहि जखमी
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 05, 2023 21:05 PM
views 911  views

कणकवली : कणकवलीत सर्विस रस्त्यावरून चालत जाणाऱ्या कणकवली बिजलीनगर येथील कीर्ती सावंत यांना कार चालकाने जोरात धडक दिल्याने अपघात झाला आहे या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. तर कीर्ती सावंत यांच्या सोबत असलेली त्यांची भाची कारची धडक बसून देखील सुदैवाने किरकोळ जखमी झाली. कारच्या धडकेने त्यांची भाची दूरवर फेकली गेली अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. हा अपघात कणकवलीत तहसील कार्यालयासमोरील एका हॉटेल समोर रविवारी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर जखमी महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर तिच्या भाचीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमानात रक्तस्राव झाला होता. अपघातानंतर कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मनोज गुरव, यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपस्थित त्यांनी जखमी महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.