
सावंतवाडी : कारीवडेत एका महिलेवर मगरींन हल्ला केला. या हल्ल्यात महिला मृत्यूमुखी पडली आहे. पेडवेवाडी हळदीचा कणा येथील लक्ष्मी बाबली मेस्त्री असं त्या महिलेच नाव आहे. काल दुपार पासून ती महिला बेपत्ता होती. आज सकाळी येथील धरणात तीचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलिसांसह वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत.