
दोडामार्ग : गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाच्या संततधारीचा फटका दोडामार्ग पणतूर्ली येथील वसंत गवस यांना बसला आहे. त्यांनी राहत्या घरा शेजारी बांधलेली विहीर पूर्णतः जमिनीत कोसळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त गवस यांना नुकसा भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना पदाधिकारी रामदास मेस्त्री यांनी केली आहे.