अमित सामंत यांच्या वाढदिनी राजकारणापलिकडील मैत्रीचं दर्शन

सर्वपक्षीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Edited by: विनायक गावस
Published on: June 21, 2023 15:44 PM
views 117  views

 सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सर्वपक्षीय नेतेमंडळीनी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहत अमित सामंत यांना वाढदिनी शुभेच्छा दिल्या. राजकारणाच्या आखाड्यात एरवी दररोज भिडणाऱ्या नेत्यांमधील मैत्री या निमित्ताने पहायला मिळाली.


 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस कुडाळ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वपक्षीय नेतेमंडळीनी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहत अमित सामंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रतिस्पर्धी असणाऱ्या भाजप, मनसेसह मित्रपक्ष शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेसच्या नेत्यांनी यावेळी उपस्थिती दर्शविली होती.  सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत केक कापून अमित सामंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना भविष्यातील राजकीय वाटचालीकरीता देखिल शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, माजी आमदार परशुराम उपरकर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, अमरसेन सावंत, अभय शिरसाट, कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांसह सर्वपक्षीय नेतेमंडळीनी, राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व अमित सामंत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.