
सावंतवाडी : इन्सुली ग्रामपंचायतीचे शिवसेनेचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच कृष्णा सावंत यांनी शिवसेनेला रामराम करत भाजपा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय. कृष्णा सावंत यांच्या भाजप प्रवेशानं इन्सुलीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. गेली २५ वर्षे शिवसेने पक्षाचे निष्ठावंत म्हणून कृष्णा सावंत यांची ओळख असून ते इन्सुली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, श्री देवी माऊली देवस्थान उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत. इन्सुलिचे पोलीस पाटील पदही त्यांनी भूषवले होते. या प्रवेशप्रसंगी माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, भाजप जिल्हा ओबीसी सेलचे सरचिटणीस विकास केरकर,निवृत्त पोलीस अधिकारी अशोक सावंत, ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर राणे, माजी सदस्य महेश धुरी, शक्तिकेंद्र प्रमुख नितीन राऊळ, हरिश्चंद्र तारी यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.