
सावंतवाडी : मोबाईलच्या काळात गेल्या २०-२५ वर्षात लुप्त झालेल्या क्रिडा प्रकारांना नव्या पिढीला अवगत करण्यासाठी व हे खेळ जे लोक खेळले आहेत अशा सर्व नागरिकांसाठी त्यांच्या बालपणातील रम्य आठवणी जागवण्यासाठी 'अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग ' या सामाजिक संस्थेने यंदा सावंतवाडी शहरात प्रथमच माझा वेंगुर्ला संचलित 'खेळ आठवणीतील' या उपक्रमाद्वारे लुप्त झालेल्या विटी दा्ंडु,हुतुतु,टायर फिरवणे,पकडा पकडी,तळ्यात मळ्यात,सागर गोट्या,लंगडी,आईचा रुमाल असे जवळपास २० हून अधिक क्रिडा प्रकार खेळण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे.
जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांसहीत या महोत्सवात येऊन मुलांना हे खेळ शिकून खेळण्यास प्रोत्साहित करावे. तसेच जे नागरिक आपल्या बालपणात हे खेळ खेळले आहेत ते नागरिक ही या क्रिडा प्रकारात भाग घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9421073383,7083974400 असं आवाहन करण्यात आले आहे.