
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडीच्या माहीती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवसीय टेक फेस्ट २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. २४ व २५ जानेवारीला याचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी क्विज कॉम्पिटिशन, वेब डेव्हलपमेंट, मोबाईल फोटोग्राफी, मोबाईल व्हिडिओग्राफी तर दुसऱ्या दिवशी डी बगींग, ब्लाईंड टायपिंग, व पीपीटी प्रेझेंटेशन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजन आयटी विभाग प्रमुख प्रा. अक्षता गोडकर व संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विभा गवंडे त्याचबरोबर विद्यार्थी प्रतिनिधी कुणाल गावडे व महादेव परब यांनी विभागाचे वतीने केले आहे. तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कुणाल गावडे ९४०३९३७९४२, महादेव परब ७३७८७३१८१६ यांच्याशी संपर्क साधावा.