
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये चार नव्याने तज्ञ डॉक्टर शासनाकडून मिळाले असून या चार नव्या डॉक्टरांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा कार्यभार स्वीकारला आहे अशी माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसूरकर यांनी दिली आहे. रुग्णालयाची तपासणीची वेळ सकाळी ८.३० ते १२.३० पर्यंत असून अपघाती व इमर्जन्सी रुग्णांसाठी 24 तास एक डॉक्टर रुग्णालयात असून वेगवेगळे निदान झाल्यास अशा प्रकारच्या वेगवेगळे तज्ञ डॉक्टर बोलवून रुग्णांना सेवा देण्याचे काम महाराष्ट्र शासनामार्फत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आजपर्यंत चालू आहे.
त्यामुळे सर्व रुग्णांनी व नातेवाईकांनी सकाळी ८.३० ते ११.०० पर्यंत डॉक्टरांना भेटून आपल्या आजाराचे निदान करून घ्यावे त्यानंतर डॉक्टर निदान करण्यासाठी त्यामध्ये रक्त व लघवी तपासणी व तसेच एक्स-रे सोनोग्राफीचे रिपोर्ट आल्यानंतर रुग्णांनी औषधोपचारासाठी सल्ला घेऊन दुपारी १२.३० पर्यंत व सायंकाळी ४.०० ते ५.०० यावेळेत औषधे रुग्णांना मिळू शकतात. अनेक रुग्ण रुग्णालयात नातेवाईक गंभीर नसताना दुपारी १२.३० नंतर रुग्णाला तपासण्यासाठी घेऊन येतात त्यामुळे अनेक रुग्णांना औषधे व रुग्णाची तपासणी रुग्णालयाच्या वेळेनंतर आल्यास मिळू शकत नाही. डॉक्टर १२.३० ला ओपीडी तपासणीमध्ये नसल्याने रुग्णांना दुसऱ्या दिवशी परत तपासण्यासाठी व औषधे घेण्यासाठी रुग्णालयाच्या वेळेत यावे लागते.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ६० वर्ष वयावरील जेष्ठ नागरिक तसेच 20000 च्या आत उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी तहसीलदारांकडून उत्पन्नाचा दाखला आणल्यास अंध, अपंग, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद, एचआयव्ही, कॅन्सर, मलेरिया, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व गरोदर स्त्रिया इत्यादींना तसेच अपघात झाल्यास सर्पदंश विद्युत वाहिनीचा शॉक, अवकाशातून विज पडून शॉक झाडावरून पडणे व छपरावरून पडणे पाण्यात पडणे विषप्राशन करून गंभीर रुग्ण अशा प्रकारचे विविध अपघात झाल्यास तशा प्रकारची पोलीस केस झाल्यास रुग्णांना सर्व उपचार मोफत महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये होत असतात. या सुविधा काँग्रेस सरकारच्या कालावधीपासून कित्येक वर्षे ही मोफत सुविधा आतापर्यंत चालू आहे. तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नव्याने आलेले ४ डॉक्टर डॉ. ज्ञानेश्वर अर्जुन ऐवळे (स्त्रीरोगतज्ञ), डॉ. प्रवीण लक्ष्मण देसाई (बालरोग तज्ञ),डॉ. मुकुंद मधुकरराव अंबापुरकर (हृदयरोग व मेंदू रोग तफज्ञ),ऐनआरएचएम,
डॉ. अभिषेक रोडे (एमबीबीएस) यांसस सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉ. संदीप सावंत (बालरोगतज्ञ),डॉ.पांडुरंग वजराटकर (जनरल सर्जन),डॉ. गिरीश चौगुले (जनरल सर्जन),डॉ. निखिल अवधूत (अस्थिरोग तज्ञ ऑर्थोपेडिक सर्जन हाडांच्या विकारांचे तज्ञ डॉक्टर),डॉ.आकाश एडके (एमबीबीएस), डॉ. धीरज सावंत (स्त्रीरोगतज्ञ एनआरएजएम),डॉ. दीपक लादे (बी एम एस आयुर्वेदिक तज्ञ),डॉ. सागर जाधव (आयुष) (आयुर्वेदिक तज्ञ),डॉ. मनाली उमेश पतवारी (फिजिओथेरेपी तज्ञ भौतिकोपचार तज्ञ), डॉ. समीर धाकोरकर (दंतचिकित्सा तज्ञ),
डॉ. शुभाजित धुरी(नेत्र चिकित्सा अधिकारी) तपासणी दर मंगळवार व शुक्रवार कार्यरत आहेत. गोरगरीबांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन राजू मसुरकर यांनी केले आहे.