सावंतवाडी आठवडा बाजाराच्या जागेबाबत पालकमंत्र्यांना निवेदन

फिरते व्यापाऱ्यांसह हॉकर्स संघटनेचे अँड. संदीप निंबाळकर, महेश परूळेकर यांनी दिलं 1000 सह्या असलेलं पत्र
Edited by: विनायक गांवस
Published on: April 11, 2023 17:36 PM
views 202  views

सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर व मोती तलाव काठावरील जागेस त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आठवडा बाजार मोती तलाव काठावरच भरवला जावा किंवा अन्य योग्य जागेचा विचार केला जावा, यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना १ हजार सह्यांच पत्र देण्यात आल. फिरते व्यापाऱ्यांसह हॉकर्स संघटनेचे अँड. संदीप निंबाळकर, महेश परूळेकर यांनी हे पत्र देत आठवडा बाजारासंबंधिच्या व्यथा पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.


आज हा बाजार हलविण्यात येणार होता. मात्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी १३ एप्रिलला जागेची पाहणी करून जागा निश्चित करणार आहेत.‌ याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात आलेल्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना १ हजार सह्यांच पत्र फिरत्या व्यापाऱ्यांसह हॉकर्स संघटनेचे अँड. संदीप निंबाळकर, महेश परूळेकर यांनी दिल.


यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, बंटी पुरोहित, मनोज नाईक, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.