सावंतवाडी रेल्वे स्टेशन प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन

Edited by: विनायक गावस
Published on: August 19, 2023 15:38 PM
views 287  views

सावंतवाडी : सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन प्रवाशांच्या मागण्या आणि गैरसोई संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रेरणा फाऊंडेशन संस्थापिका दीप्ती दत्ताराम गावकर यांनी निवेदन देत लक्ष वेधलं आहे.


कोकण रेल्वेच्या मार्गावरील जोडणारे महत्वाचे रेल्वे स्थानक सावंतवाडी स्थानकात विविध समस्या अनेक दिवसांपासून आहेत. या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्या यासाठी प्रवाशांनी अनेक वेळा संबंधित रेल्वे प्रवाशांस वेळोवेळी विनंती  केली आहे. परंतु संबंधित समस्या सोडवण्याबाबत आजपर्यंत दुर्लक्ष दिरंगाई झाली आहे. गणेश उत्सव अगदी तोंडावर आहे. कोकणातील गणेशोत्सव राज्यातील नाही तर संपूर्ण देशातील पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाणारा मोठा उत्सव आहे. लाखो चाकरमानी त्या उत्सवासाठी लवकरच कोकणाकडे रवाना होणार आहेत ही बाब लक्षात घेऊन सावंतवाडी स्थानकातील समस्या रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर सोडवून कोकणातील प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.