नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलेला शिलाई मशीन

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 23, 2023 15:47 PM
views 162  views

कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नाटळ राजवाडी येथील रत्नप्रभा सावंत यांना माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते शिलाई मशीन देण्यात आली. यावेळी विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, सरपंच बापू सावंत, सरपंच संजय सावंत, सुरेश ढवळ, मयुरी मुंज, राजश्री पवार, मिलिंद बोभाटे उपस्थित होते.

रत्नप्रभा सावंत  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्याकडे आपल्या व आपल्या अपंग असलेल्या मुलाच्या उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीनची मागणी केली होती. त्यावेळी गोट्या सावंत यांनी लगेच तत्परतेने आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नप्रभा सावंत यांना शिलाई मशीन भेट दिली.

यावेळी रत्नप्रभा सावंत यांनी आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांचे आभार मानले.